एलबीबी ने विश्वसनीय सिटी-गाईडचा किताब कसा मिळवला?

लिटील ब्लॅक बुकची संस्थापक, सुचिता सलवान - दिल्ली, बंगलोर आणि गुडगावच्या रहिवाशांची सांस्कृतिक आणि जीवनशैलीची मदतनीस मार्गदर्शक, आपल्या सांगत आहेत की त्यांना हे साहस करायची प्रेरणा कशी मिळाली आणि त्यांना पुढच्या आयुष्यात कोणता टप्पा गाठायचा आहे.

शीरोज मध्ये आपले स्वागत आहे. आम्हाला स्वतः बद्दल आणि लिटील ब्लॅक बुकची कल्पना आपल्याला कशी सुचली याबद्दल थोडक्यात सांगा?

मी बीबीसी सोबत काम करत असतानाच, २०१२ मध्ये एलबीबी सुरु केले. चांगला पगार असेलली एक तरुण, काम करणारी प्रौढ व्यक्ती म्हणून, मला दिल्लीत घडत असलेल्या घटनांमुळे मला तिथे रहाणे अवघड वाटत होते. याद्या अवघड होत्या, नियमितपणे अपडेट केल्या जात नव्हत्या....कामचलाऊ, पण अत्यंत कंटाळवाण्या. माझ्यासाठी, एलबीबी म्हणजे मला दिल्लीत उमगलेल्या गोष्टींची लेखी माहिती ठेवण्याचा एक मार्ग होता, आणि मला आशा वाटत होती की, मला आढळलेल्या सर्व विस्मयकारक गोष्टींद्वारे मी लोकांना बाहेर पडून माझ्या सल्ल्यानुसार दिल्ली पाहण्याची प्रेरणा देऊ शकेन.

अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवल्यानंतर, मी विझक्राफ्ट सोबत कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप समारंभादरम्यान काम केले, माझ्या कर्तव्याचा एक भाग म्हणून मी जवळपास १४,००० लोकांचे व्यवस्थापन केले आणि या कार्यक्रमातून अनेक चांगल्या गोष्टी शिकले. अश्या कार्यक्रमांमध्ये काम केल्यामुळे उपयोगकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या घराबाहेर पडून जे त्यांनी कधीही केले नसते त्याचा अनुभव घेण्यास प्रेरित करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे याबद्दलचा चांगला दृष्टीकोन मिळतो. विझ नंतर, बीबीसी एन्टरटेनमेंट इंडियाच्या उद्घाटनावर कार्य करण्यासाठी मी बीबीसीच्या दोन सदस्यांच्या (माझे बॉस आणि मी) मार्केटिंग विभागात रुजू झाले. प्रक्रियांचे मूल्य आणि चांगल्या प्रोग्रामिंग /  सामग्रीमुळे दीर्घकाळ लाभ कसा होतो हे समजण्याचे असाधारण कार्य या नोकरीमुळे झाले. २०१२च्या अखेरीस, मी एलबीबी मध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी बीबीसी मधील काम सोडले आणि तेव्हापासून मी इथेच आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत, आम्हाला आपल्या व्यवसायाच्या प्रवासाबद्दला सांगा

हा प्रवास अत्यंत फलदायी झाला आहे - वैयक्तिकरित्या सुद्धा. महान सह-संस्थापक शोधण्यापासून, ते काही सर्वोत्तम दयाळू गुंतवणूकदार, सल्लागार आणि उद्योजकांकडून शिकण्यापर्यंत - एलबीबीने मला केवळ व्यवसाय उभा करण्याची संधीच दिली नाही तर मला खूप काही शिकवतील अश्या लोकांचे नेटवर्क देखील तयार केले आहे.

एक टीम म्हणून, आमच्या वाचकांकडून एलबीबी वरील अभिप्राय ऐकणे हे आमच्यासाठी सर्वोत्तम क्षण आहेत. विशेषतः अॅप बद्दल - आम्ही मोठ्या प्रमाणात मजकूर गोळा करण्यासाठी आणि आमच्या उपभोक्त्यांना याचा वापर सहज करता येईल यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा उपभोक्ता आम्हाला सांगतात की, त्यांना एलबीबीमुळे सर्वोत्तम स्थळे/स्टोअर्स/रेस्टॉरंट्स सापडली आहेत तेव्हा हे ऐकून आम्हाला खूप आनंद होतो. अर्थातच, आमचा ७०% इनबाउंड जाहिरात दर आणि ६०% पुनरावर्तन दर, आम्ही कार्य करत असलेल्या ब्रँड्सना कसे प्रभावित करतो हे सूचित करते.

प्रारंभिक कामकाजाच्या दृष्टीकोनातून तुम्ही या सर्वांचे व्यवस्थापन कसे केले?

सुरवातीची दोन वर्षे (2013, २०१४) खूप कठीण होती - म्हणजेच, आम्ही त्या काळात फक्त चालढकल करत होतो, आणि कमीत कमी नफा वसूल करत होतो आणि आमच्या उत्पादनात गुंतवणूक करत होतो. पण या काळात आम्ही मजकूर आणि डीजीटल व्यवसायाबद्दल जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. ग्राहकांचा आवाका आणि ब्रँड यांच्या संबधात तुलना करताना कुठे कमी पडतो हे जाणण्यासाठी मी दिल्लीमधील लहान आणि मध्यम उद्योजकांसोबत बराच वेळ घालवला. या मुद्द्याच्या दोन्ही बाजू - उपभोक्त्यांच्या आवडी निवडी आणि ब्रँड्सची मजल - समजून घेतल्यामुळे आमच्या उत्पादनाला योग्य आकार देण्यात बरीच मदत झाली.  

एलबीबी बाबत तुमच्या भविष्यातील योजना / उद्दिष्टे काय आहेत?

आमची इच्छा आहे की शहरी उपभोक्त्यांनी, जागतिक स्तरावर, लिटील ब्लॅक बुकचा कसा उपयोग करायचा हे ठरवावे.  

आरंभीच्या काळात देखील, एलबीबीने असे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जिथे तुमचे शोधणे कमी आणि कार्य जास्त होते. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत आम्ही जी प्रमुख वैशिष्ट्ये सादर करीत आहोत ज्यामध्ये समाविष्ट आहे, वैयक्तिकरण (ज्यामुळे प्रत्येक उपभोक्त्याकडे त्यांच्या आवडी-निवडी नुसार, विशिष्ठ फीड असेल), एलबीबी मध्ये अधिक लेखक जोडणे ज्यामुळे तुम्हाला अधिक आशय वाचायला मिळू शकेल, आणि कंझम्प्शन लूप बंद करणे - ज्यामुळे “थिंग टू डू” पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला अधिक पानांवर जावे लागणार नाही.   

अर्थातच, आमची इच्छा आहे की भारतातील सर्व महत्वाच्या शहरांचे लिटील ब्लॅक बुक असावे - येत्या वर्षाच्या अखेरीस तुम्ही आम्हाला मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली आणि गुडगाव येथे पाहू शकाल.

टाईम आउट, ब्राऊन पेपर बॅग इत्यादी प्रतीस्पर्ध्यांपेक्षा लिटील ब्लॅक बुक कसे वेगळे आहे?

मला वाटते की महत्वाचे फरक आहेत :

अ. आमच्या मजकुराला तंत्रज्ञानाचे समर्थन आहे. उत्पादन आणि व्यवसायाबद्दलच्या आमच्या दृष्टीकोनात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे, आणि मागील सहा महिन्यात आमच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रगतीचे कारण आहे आमचे मजकूर मिळवणे आणि ब्रँड्स पर्यंत पोहचणे.

ब. आम्ही “थिंग्स टू डू” ला साकल्यपद्धतीने पूर्ण करतो. एलबीबी फक्त कुठे खायचे आणि कोणत्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे त्याबद्दल मार्गदर्शन करते. “थिंग्स टू डू” ला आम्ही अशी श्रेणी मानतो ज्यामध्ये जीवनशैली, खरेदी, उपक्रम, प्रवास आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. यामुळे उपभोक्त्यांना आमच्या कडे वारंवार परत येण्याचे कारण मिळते, कारण आम्ही त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी काय केले पाहिजे हे ठरावयास मदत करतो.

वाचकांनी विचार करावे अश्या काही कल्पना?

नेहमी स्वतःपेक्षा हुशार असलेल्या व्यक्तींच्या सहवासात रहा, आणि / किंवा तुम्हाला पूरक असेल अश्या क्षेत्रामध्ये निपुणता मिळवा. ही अशी शिकवण आहे  जी इतर कुठेही मिळणार नाही – हे सर्वोत्तम कार्य आहे जे मी स्वतःसाठी केलेले आहे.


Dhara Joshi

Share the Article :